आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:विधानसभा अध्यक्षपदावर काँग्रेस पक्षाचाच हक्क, पवारांच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण

नागपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभेचे अध्यक्षपद आतापर्यंत काँग्रेसकडेच होते. आताही त्यावर काँग्रेसचाच हक्क आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना दिले.

आतापर्यंत विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे होते. आता मात्र ते खुले झाले असून महाविकास आघाडीतील घटकपक्ष चर्चा करून निर्णय घेतील, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांचे स्पष्टीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असले तरी विधानसभेचा अध्यक्ष तीन पक्ष मिळून निवडलेला आहे. परंतु आताच्या स्थितीत ते पद काँग्रेसच्या वाट्याला आहे. तीन पक्षांनी मिळून निवड करायची आहे. फार्म्यूल्यात बदल करण्याचे अधिकार हायकमांडना आहे. यावरून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे, असे मला वाटत नाही.

तीन पक्ष किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलेले आहेत. एकत्र येताना ठरल्यानुसारच पुढे जाण्याचा निर्णय झाला असल्याचे ते म्हणाले.