आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमबाह्य विक्री:गर्भपात औषधांची विक्री, ऑनलाइन पोर्टलवर नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे उघडकीस आले होते, ‘मिशो’वर 13 गुन्हे दाखल

नागपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भपातासाठी वापरात येणारी औषधांची ‘मिशो’ या ऑनलाइन पोर्टलवर नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनातर्फे राज्यात तेरा ठिकाणी कंपनीवर गुन्हे दाखल केले आहेत.

या औषधांची ऑनलाइन विक्री होत असल्याची तक्रार अन्न व औषध मंत्र्यांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी राज्यातील विविध भागांतून ‘मिशो’वर विना प्रिस्क्रिप्शन एमटीपी किट या औषधाची मागणी नोंदविण्यात आली होती. पोर्टलच्या मुखपृष्ठावर हे औषध उपलब्ध असल्याचे आढळून येत नाही. परंतु सर्च विंडोमध्ये एमटीपी या अक्षराने शोध घेतला असता एमटीपी औषधांचे अनेक पर्याय आढळून येतात. त्यापैकी एक पर्याय निवडला असता गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या अनवाँटेड किट, डाॅ. मोरपेन एमटीपी किट या नावाने विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या पॅकिंगमधील औषधांच्या प्रतिमा विक्रीसाठी प्रदर्शित होत असल्याचे आढळून आले होते.

मुंबई, ठाणे, कोल्हापूर, जळगाव, नागपूर या ठिकाणच्या अन्न व औषध निरीक्षकांनी स्टिंग करण्यासाठी ऑनलाइन या औषधांची खरेदी केली. ही मागणी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय स्वीकारली गेली. मुंबई येथे ९, ठाणे येथे ३, कोल्हापूर येथे १ जळगाव येथे १, नागपूर येथे १ व औरंगाबाद येथे एक अशा एकूण १६ एमटीपी किट कुरिअर पार्सलद्वारे प्राप्त झाल्या.

औषधांच्या पुरवठादारांवर महाराष्ट्राबाहेरील
गर्भपाताची औषधे वाराणसी, आग्रा, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील पुरवठादाराकडून पाठविण्यात आली. त्यावरुन गर्भपाताच्या औषधाची बेकायदेशीर विक्री केल्याच्या ‘मिशाे’शी संलग्न दिल्ली व उत्तर प्रदेश येथील विक्रेत्यांविरुद्ध बृहन्मुंबई येथे ६, ठाणे येथे ३, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद व नागपूर येथे प्रत्येकी १ असे एकूण १३ एफआयआर विविध कलमांखाली पोलिस विभागाकडे नोंदवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...