आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअ. भा. मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या अतिरेकामुळे सामान्य साहित्य रसिकांना मनस्ताप सहन करावा लागला. खुद्द संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांचेही वाहन अडवण्यात आले. त्यांची कन्या भक्ती चपळगावकर यांनीही समाजमाध्यमावर नाराजी व्यक्त केली.
संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमातही पोलिसांना साहित्य रसिकांना अडवून धरू नये, असे आवाहन व्यासपीठावरून करावे लागले हाेते. “गेले दोन दिवस सरकारी सुरक्षा व्यवस्थेमुळे माझ्या बाबांना आणि त्यांच्या ८८ वर्षांच्या मित्राला - डाॅ. सुधीर रसाळ यांना वेळोवेळी अडवण्यात आले. मुख्यमंत्री आले तेव्हा ९०० पोलिस होते. आणि रविवारी उपमुख्यमंत्री येणार म्हणून होते. मी प्रत्येक वेळी पोलिसांना समजावून, विनंती करून, ओरडून मार्ग काढला,’ अशी पोस्ट भक्ती यांनी सामाजिक माध्यमांवर केली. साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही संमेलनाची पोलिस छावणी करणे थांबवलेच पाहिजेे. याहून लज्जास्पद स्थिती अजून किती आपण येऊ द्यायची? असा संतापही जोशी यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.