आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • The Sessions Court Acquitted The Three For Lack Of Evidence; He Was Accused Of Murdering A Friend | The Sessions Court Acquitted The Three For Lack Of Evidence

निर्दोष मुक्तता:पुराव्याअभावी सत्र न्यायालयाने तिघांची केली सुटका; मित्राच्या खुनाचा होता आरोप

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यमान सत्र न्यायाधीश नागपूर एस. बी. गावंडे यांनी आरोपी स्नेहांशु बोरकर (वय 22), वर्ष निहाल शंभरकर (वय 21) वर्ष आणि पवन भोसले (वय 24) या तिघांची प्रतीक ढेंगरे याच्या खूनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

सरकारी पक्षानुसार 31 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी बारा वाजता मृतक प्रतीक हा आपले आपले मित्र ऋत्विक, आकाश, आणि संकेत बागडे यांच्यासह सम्राट अशोक गार्डन येथे गप्पागोष्टी करीत असता स्नेहांशु बोरकर (वय 22), वर्ष निहाल शंभरकर (वय 21) वर्ष आणि पवन भोसले (वय 24) हे तिघे तिथे आले. या तिघांनी प्रतीकला लाकडी राफ्टर आणि चाकूने मारहाण केली. त्यानंतर सर्व आरोपी पळून गेले. प्रतीकच्या मित्रांनी त्याला त्वरित मेडिकल कॉलेजमध्ये भरती केले. परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. सदर घटनेचा रिपोर्ट पोलिस स्टेशन अजनी येथे ऋत्विक बोरकर यांनी केला. त्या रिपोर्ट वरून तीनही आरोपी विरुद्ध गुन्हा कलम 302, 34 भादंवि प्रमाणे दाखल करण्यात आला.

ऑनलाइन चाकू मागवला

गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक बनसोडे यांनी केला आणि आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणी एकंदरीत आठ साक्षीदारांची साक्ष कोर्टात नोंदवण्यात आली. घटनेत वापरण्यात आलेल्या चाकू हा स्नेहांशु बोरकर यांनी फ्लिपकार्ट वरून बोलावला होता. तो पोलिसांनी जप्त केला.

आरोपी निर्दोष मुक्त

बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला की तिन्ही मित्रांच्या साक्षी या विसंगती पूर्ण आहे. तसेच मृतकाच्या शरीरावर करण्यात आले तसे घाव सदर चाकूने होऊ शकत नाहीत, त्यामुळे संशयाचा फायदा आरोपींना देण्यात यावा. संपूर्ण पुराव्याचा विचार करून विद्यमान न्यायाधीशांनी आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. सरकार पक्षातर्फे एपीपी श्रीमती कल्पना पांडे यांनी बाजू मांडली तर बचाव पक्षातर्फे ॲड. चंद्रशेखर जलतारे आणि ॲड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...