आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:राज्य शासनाने पॉझिटिव्ह माहिती द्यावी, राज्यातील रुग्ण संख्या कमी झालीत तर आम्हाला आनंदच - देवेंद्र फडणवीस

वर्धा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक

राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून, मृत्यूचे प्रमाण वाढतीवर आहेत. राज्य शासनाने पॉझिटिव्ह माहिती द्यावी, रुग्ण संख्या कमी झालीत तर आम्हाला आनंदच होईल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना आजाराच्या संदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयात आढावा बैठक दरम्यान व्यक्त केले आहे.

राज्याची परिस्थिती अंत्यत बिकट होत आहेत, त्याच बरोबर मृत्यूच्या संख्या वाढत आहे. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन लावण्यात आला असूनही, रुग्ण संख्या वाढत आहे. आजारावर मात करण्यासाठी लसीकरण केले जात असून,वर्धा जिल्ह्यातील तीन रुग्णालयावर अधिक भार आहेत.आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असून, ती वाढविण्याची गरज आहेत.त्वरित प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी.रुग्णांची वाढती संख्या बघता अतिदक्षता विभागातील खाटा व साधारण खाटा वाढवण्याची गरज आहेत. राज्य शासनाने आकडेवारीची लपवाछपवी करु नये, पॉझिटिव्ह माहिती द्यावी,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहेत,रुग्ण संख्या कमी झालीत तर आम्हाला आनंदच होईल असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, दादाराव केचे,समीर कुणावार, माजी आमदार चंद्रशेखर बावणकुळे, शिरीष गोडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक
कोरोना आजारांची वाढती आकडेवारी यावर जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा उभी करावी,सोबतच रुग्णालयातील खाटा वाढवण्यात यावे.याकरिता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले यांच्या अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...