आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईश्वर देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे यशाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा भारतीय गांधर्व महाविद्यालयाद्वारा आयोजित संगीत परीक्षेत २२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. हे विद्यार्थी नोव्हेंबर २०२२ मध्ये परीक्षेला बसले होते. त्याचा निकाल लागला आहे. यामध्ये १५ विद्यार्थी गायन प्रारंभिक परीक्षेला बसले होते. तर ७ विद्यार्थी तबला प्रारंभिक परीक्षेसाठी होते. गायनामध्ये विशेष योग्यतेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी श्रवंती डाखोरे, नव्या जाधव, जिया राठोड, संतोषी वानखडे, पूर्वी राठोड, अनुष्का दाभाडकर, प्रिनिया शनोज, मुक्ता देशमुख, श्रेया डोंगरे, राजलक्ष्मी खोडके, अधिश्री इंगोले, सुमैया पटेल, स्वरा सोळंके, आराध्या धुर्वे तसेच प्रथम श्रेणीत सप्तश्री मारकडने यश मिळवले आहे.
तबला प्रारंभिक परीक्षेत प्रथम श्रेणीत वरद भरारे, अथर्व दाभाडकर, श्याम राठोड, राजवीर राठोड, महारुद्र मारकड, आराध्य पंडागळे आणि आदित्य पत्रे या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख व संस्थेच्या सचिव वैशाली देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य शनोज कुमार व्ही. के व उपप्राचार्या नेहा शनोज यांनी सर्व विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय नारिंगे, पंकज तसेच सर्व शिक्षकांना दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.