आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुलांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू; नागपुरात 2 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील 14 मुलांना लस

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील 22 लहान मुलांचे केले स्क्रीनिंग

लहान मुलांवरील कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नागपुरात सुरुवात झाली आहे. भारत बायोटेककडून कोरोना लसीकरणातील लहान मुलांच्या मानवी चाचणीचा हा तिसरा टप्पा आहे. यापूर्वी १२ ते १८ आणि ६ ते १२ या वयोगटातील मानवी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यात २ वर्षे ते ६ वर्षे या वयोगटात १४ मुलांना ही लस दिली जाणार आहे. शुक्रवारी १० लहान मुलांना लस देण्यात आली. उर्वरित चार जणांना ट्रायल लसीचा पहिला डोस नंतर दिला जाणार आहे. नागपूरच्या मेडिट्रिना रुग्णालयात २ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.

पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटानंतर दुसऱ्या टप्प्यात ६ ते १२ या वयोगटात तर आता तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ वयोगटातील स्वयंसेवी मुलांना ही लस देण्यात आली आहे. या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी २२ लहान मुलांचे स्क्रीनिंग करण्यात आले. यामध्ये १४ मुलांची निवड करण्यात आली आहे. सर्व मुलांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सुदृढ असणाऱ्या बालकांची, निगेटिव्ह असणाऱ्या मुलांची लसीच्या ट्रायलसाठी निवड करण्यात आली. यात प्राथमिक माहितीनुसार, तीन ते चार जणांच्या अँटिबॉडीज पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

२८ दिवसांनी मिळणार दुसरा डोस
पहिला डोस देण्यात आलेल्यांना २८ दिवसांनी लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. यामुळे या ट्रायलचा फायदा लवकर लहान मुलांसाठी लस उपलब्ध होण्यास होणार आहे. तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना ०.५ मिलीची लस देण्यात आली आहे. यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवून काही लक्षणे किंवा साइड इफेक्ट होते का, याची नोंद घेतली जाणार आहे. यामध्ये पहिल्या दोन टप्प्यात मानवी ट्रायलचे निष्कर्ष हे सकारात्मक आहेत. मात्र, लस यशस्वी होण्यासाठी आणखी काही परीक्षणातून जावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...