आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार आहे. या चौकशीतून सत्य समोर येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली. मात्र शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टिकेवर विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी बगल दिली. अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले आहे, अशी टिका राऊत यांनी केली होती. त्यावर बोलणे देशमुख यांनी टाळले.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मासिक १०० कोटींची वसूली करायला सांगितली असा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले. एवढ्यावरच न थांबता परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप तसेच कारभाराची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी िवनंती करणारी फौजदारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या घडामोडी सुरू असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्त पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांच्यामार्फत चौकशी करावी, असे सुचवले होते.
दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही िवनंती मान्य केल्याने आता या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी होणार आहे. तीत सत्य जनतेसमोर येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.