आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:नागपुरातील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट झाली हॅक

नागपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ देश-विदेशात प्रतिक्रिया उमटत असताना आता वेबसाईटच्या जगातही याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक करण्यात आली असून ड्रॅगन फोर्स मलेशिया या कट्टरवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली आहे.

कोणत्याही धार्मिक श्रद्धांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा या कट्टरवादी संघटनेने या वेबसाईटवर दिला आहे. या मुद्द्यावर जगभरातील समविचारी हॅकर्स, मानवाधिकार संघटना आणि कार्यकर्त्यांनी भारताविरुद्ध एकत्र येऊन आघाडी उघडावी, असे उघड आवाहन या साईट हॅक करणाऱ्या संघटनेने केले आहे. वेबसाइट हॅक करून दिलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, आम्ही भारताविरुद्ध शांत राहू शकत नाही. भारताला जगभरात उघडे पाडू. आमचे हे विशेष अभियान आहे. या प्रकारानंतर खळबळ उडाली असून अनेकांनी मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, गृहमंत्र्यांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...