आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:पाचशे रुग्णांवर जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी

नागपूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपराजधानीत ‘कोरोना’वर मात करण्याचा रामबाण उपाय होऊ शकतो विकसित

कोरोना होऊन बरे झालेल्या लोकांच्या रक्तातील प्लाझ्मा घेऊन कोरोना रुग्णाच्या रक्तात सोडल्यास रुग्ण बरे होऊ शकतात का, हे पडताळून पाहण्यासाठी प्लाझ्मा थेरपीची चाचणी अनेक देशांमध्ये सुरू आहे. मात्र, नागपूरच्या मेडिकल काॅलेजने कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर ही चाचणी करून पाहण्यासाठी विशेष परवानगी नुकतीच प्राप्त केली आहे. एकूण ५०० रुग्णांवर केली जाणारी ही चाचणी जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल असणार आहे. यातून प्लाझ्मा थेरपीबद्दल काही चांगले निष्कर्ष पुढे आले, तर कोरोनावरील रामबाण उपाय म्हणून ही थेरपी प्रचलित होऊ शकते. मेडिकलचे अधिष्ठाता डाॅ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात या चाचण्या करण्यात येणार असून डाॅ. सुशांत मेश्राम हे चाचणी संयोजक असतील. २८ दिवसांनंतर चाचण्यांचे मूल्यांकन करण्यात येईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ५०० हून अधिक रुग्णांना बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा देण्यात येणार आहेे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला डीजीसीआयने होकार दिल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डाॅ. संजय मुखर्जी यांनी ११ जून रोजी ट्विट करून दिली. ड्रग कंट्रोलर आॅफ इंडियाच्या अंतिम मान्यतेनंतर मेडिकल या चाचण्यांसाठी पुढाकार घेणार आहे.

कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी काम करील आणि यामुळे पुढील सहा महिन्यांच्या टप्प्यात किमान ५ हजार गंभीर रुग्णांचे प्राण वाचू शकतील, असे डाॅ. फैजल यांनी सांगितले. आम्ही “क्यूअर टू क्रिटिकल’ या संकल्पनेवर काम करीत आहोत. प्लाझ्मा थेरपी उपयुक्त असून आतापर्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. गंभीर कोरोना रुग्णांचे प्राण नक्कीच वाचवू शकते, असे डाॅ. फैजल म्हणाले.

दोनदा प्लाझ्मा दान शक्य

कोरोनामधून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करू शकतात. एका महिन्यात दोनदा प्लाझ्मा दान करता येऊ शकतो. हे सुरक्षित आहे. यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग केल्या जात असल्याने रुग्णाला अजिबात थकवा जाणवत नाही. दरम्यान, प्लाझा थेरपीतून गंभीर रुग्णांचे प्राण वाचले तर ही थेरपी एक वरदान ठरेल, असे तज्ज्ञांना वाटते.

पहिल्या टप्प्यात २३ रुग्णालये

पहिल्या टप्प्यात राज्यभरातील २३ रुग्णालयांमधील २३८ रुग्णांना सहभागी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यामध्ये १७ जीएमसी आणि ५ कॉर्पोरेशन वैद्यकीय महाविद्यालये आहेत, अशी माहिती राज्य नोडल अधिकारी आणि चाचण्यांसाठी प्रशासकीय समन्वयक डॉ. मोहंमद फैजल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...