आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 दिवसांनी आढळला मृतदेह:ऑनलाइन गेमच्या नादात तरुणाने चक्क घेतली गोसीखुर्द धरणात उडी

भंडाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल हाताळताना पवनी तालुक्यातील चिचाळ येथील एका तरुणाला मित्रांच्या सोबतीने ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला. या खेळातील टास्कमुळे या तरुणाने गोसीखुर्द धरणात पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. तब्बल चार दिवसांनंतर या तरुणाचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात आढळला.

अजविल दिलीप काटेखाये (१९, रा. चिचाळ, ता. पवनी) असे मृताचे नाव आहे. मृताचे वडील दिलीप काटेखाये यांच्याकडे पवनी तालुक्यातील चिचाबोळी येथे १.३७ हेक्टर आर सामायिक शेती आहे. मृत तुण हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अजविलला मित्रांच्या संगतीने मोबाइलमध्ये गेम खेळण्याचा नाद लागला. मोबाइलवर गेम खेळण्याच्या आहारी गेलेल्या अजविलला अनेकदा समजावण्यात आले. मात्र, त्याचा गेम खेळण्याचा छंद सुटत नव्हता. अशातच सोमवारी (२९ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास कुणालाही काही न सांगता तो एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागून गोसीखुर्द धरणाच्या पुलावर पोहोचला. गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यात त्याने अचानक उडी घेतली.

बातम्या आणखी आहेत...