आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्र असल्याचे भासवून तरुणाला फसवले:युवकाला सोळा लाखांचा घातला गंडा; नागपूरमधील घटना

नागपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरमधून एक घटना उघडकीस आली आहे. कॅनडा येथील मित्र असल्याचे भासवून सोळा लाखांनी फसवणूक केल्या प्रकरणी आरोपीवर यशोधरा नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 ते 17 नोव्हेंबर दरम्यान यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उप्पलवाडी येथे राहणारे फिर्यादी मनिंदरसिंग महेंद्रसिंग जब्बल (वय 52) यांना त्यांच्या मोर्बाइलवर एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या आरोपीने स्वत:ला मनिंदरसिंग यांचा कॅनडामध्ये राहणारा मित्र बग्गासिंग असल्याचे भासवून त्यांच्याकडून बॅकेचे डिटेल्स घेतले व त्यांना त्याच्या बॅक खात्यावर 18 लाख 50 हजार रूपये पाठविण्याबाबत मेसेज केला.

थोड्या वेळाने सर्व्हर डाउन असल्याने फिर्यादीच्या खात्यावर पैसे जमा हाेण्यास वेळ लागेल असे सांगत आरोपीने त्याच्या मित्राची आजी आजारी असल्याने त्याला पैशाची आवश्यकता असल्याचे भासवून मनिंदरसिंग यांना वेगवेगळया बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. मनिंदरसिंग यांनी आरोपीने दिलेल्या बॅक खात्यावरती एकूण 16 लाख रूपये पाठविले. आराेपीने स्वतःची ओळख लपवून मनिंदरसिंग यांचा विश्वास संपादन करून त्यांची 16 लाखांनी फसवणूक केली. याप्रकरणी मनिंदरसिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर येथे आरोपी विरूध्द कलम 419, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच लाखांची घरफोडी

घराला कुलूप लावून बाहेरगावी जाताना शेजाऱ्याला सांगून जात जा वा घरी काेणीतरी राहु देत जा असे पोलिस विभाग वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नाही. परिणामी बंद घर फोडून चाेरीचे प्रकार वाढले आहे.

गुन्हा दाखल

सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भैयालाल वाडीत राहणाऱ्या आयुषी साकेत धानोरकर या पती व सासु-सासरे बाहेरगावी गेल्याने माहेरी मनीष नगर येथे गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी परत आल्या असता घरात चोरी झाल्याचे दिसून आले. चोराने त्यांच्या घराच्या पहिल्या माळ्यावरील बाल्कनीतून बेडरूमच्या लाकडी खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला. घरातील दोन लाकडी आलमारीतील सोन्याचे दागीने, घड्याळ व रोख 25 हजार असा एकूण 5 लाख 16 हजार रूपयांचा माल चोरून नेला. सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...