आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानपिचक्या:मदत करताना फलक लावणे गरजेचे नाही; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशोक चव्हाणांच्या फोननंतर ट्रान्सपोर्टरविरुद्ध कारवाई केली

कोराेना रुग्णांना मदत करताना राजकारण करू नका. व्हेंटिलेटर, बायपॅक, आॅक्सिजन काॅन्सट्रेटर आदी उपकरणांचे िवतरण करताना छायाचित्रे काढून फुकटची प्रसिद्धी करू नका, अशा कानपिचक्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना रविवारी एका कार्यक्रमात दिल्या.

सगळ्याच गोष्टीमध्ये फलक आणि झेंडे लावणे गरजेचे नाही. मदतीचेही राजकारण केले तर लोकांना मनातून ते आवडत नाही. मदत कार्य माहिती व्हावे इतपत मर्यादित प्रसिद्धी केली तर हरकत नाही. पण, त्याचा बागुलबुवा उभा करणे चांगले नाही. एकाच उपकरणासोबत चार जण छायाचित्रे काढून पाठवून राहिले, असे करू नका, अशा शब्दांत गडकरींनी कान उपटले.

सेवा कार्य करताना कार्यकर्त्यांनी स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी. येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांना गमावणे परवडणारे नाही. मला काही होत नाही, असे म्हणून गाफील राहू नये, असा सल्लाही गडकरींनी दिला. प्रत्येकाने रोज सकाळी एक तास प्राणायाम करावा, असे ते म्हणाले. पहिले आरोग्य, नंतर परिवार आणि त्यानंतर पक्ष हे लक्षात घ्या. भावनेच्या भरात कर्तव्य करताना स्वत:कडे दुर्लक्ष करू नका. आपल्या घरची आर्थिक घडी नीट ठेवा, असेहही ते म्हणाले.

अशोक चव्हाणांच्या फोननंतर ट्रान्सपोर्टरविरुद्ध कारवाई केली: नांदेडला ऑक्सिजन पुरवठा करणारा एक टँकर विशाखापट्टणमच्या एका ट्रान्सपोर्टरने पळवून नेला. त्याबाबत अशोक चव्हाण यांचा आपल्याला फोन आला. त्या ट्रान्सपोर्टरने आपल्याकडे १५ लाख रुपयांची मागणी केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यानंतर त्याचे टँकर मी जप्त केल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...