आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रपिता महात्मा गांधीनगरी, वर्धा
येथील साहित्य संमेलनात पुस्तकांच्या दालनांकडे वाचक फिरकला नसल्याचे पाहून प्रकाशकांमधून नाराजीचा सूर निघाला. दालनासाठी प्रकाशक तसेच पुस्तक विक्रेत्यांसाठी तीन दिवसांचे सहा ते सात हजार रुपये भाडे संयोजकांनी घेतले. मात्र अनेकांचे स्टाॅलचे भाडेही निघाले नसल्याने त्यांना आर्थिक फटका बसला.
यापूर्वी विदर्भातीलच यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात पुस्तक विक्री जेमतेम झाली. काही प्रकाशकांच्या मते १५ टक्के, तर काहींच्या मते ५० टक्क्यांच्या आतबाहेरच पुस्तकांची विक्री झाली. वर्धा येथील स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणात ३ फेब्रुवारीला साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. साहित्य संमेलनांमध्ये पुस्तक विक्री चांगली हाेते. वाचकांची मागणी पाहता अनेक विक्रेते पुस्तक खरेदी करून मोठी गुंतवणूक करतात. प्रत्येक साहित्य संमेलनात शेवटच्या दिवशी पुस्तक खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वेळेअभावी अनेक वाचकांना हवी ती पुस्तके खरेदी करता येत नाहीत. त्यावर उपाय म्हणून साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संमेलनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २ फेब्रुवारी रोजी करण्या आले. ‘चार दिवसांचे ग्रंथ प्रदर्शन’ असा नवीन पायंडा वर्धा येथील ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून सुरू केले असे सांगत आयोजकांनी थोपटून घेतली. मात्र रसिकांनी संमेलनाकडेच पाठ फिरवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.