आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकी:संघ मुख्यालय बाॅम्बने उडवून देण्याची धमकी

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेशीमबागस्थित संघ मुख्यालयासह सुरेश भट सभागृह बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या महापारेषणच्या एका कार्यकारी अभियंत्याला सक्करदरा पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. आपली मानसिक स्थिती खराब असल्यामुळे आपण हे पत्र लिहिल्याची कबुली या अभियंत्याने दिली. त्याची चौकशी केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. नंतर त्यास सोडण्यात आले. २५ नोव्हेंबरला महापारेषणच्या कर्मचाऱ्यांचा एक कार्यक्रम होता. त्याच दिवशी सक्करदरा पोलिसांना हे सभागृह बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र मिळाले. हा कार्यक्रम होऊ द्यायचा नव्हता म्हणून ही धमकी देण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता.

बातम्या आणखी आहेत...