आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:वर्ध्यात साडेतीन किलो साेन्याचे दागिने लुटले, 4 दरोडेखोर पसार, यवतमाळमधून दोघांना घेतले ताब्यात

वर्धा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुरियर बॉय असल्याचे सांगून फायनान्स कंपनीवर दरोडा

शहरातील मुख्य मार्गावरील एका फायनान्स कंपनीवर दिवसाढवळ्या कुरियर बॉय असल्याची बतावणी करत बंदुकीचा धाक दाखवून धाडसी दरोडा टाकला. सुमारे पावणेदोन कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख सव्वातीन लाख रुपये घेऊन चार दरोडेखोर पसार झाल्याची घटना गुरुवारी घडली. दरम्यान, रात्री दोन संशयितांना यवतमाळ येथून ताब्यात घेण्यात आले.

एलआयसी कार्यालयासमोरील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सकाळी ९ वाजेच्या सुमारास कुरियर बाॅय असल्याची बतावणी करून तीन दरोडेखोर कार्यालयात शिरले. त्यांनी बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर खाली असलेल्या चौथ्या साथीदारास बोलावून घेत लेखापालास बंदिस्त केले. त्याला दागिने असलेल्या ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर एक कोटी ७५ लाख रुपयांचे साडेतीन किलो सोन्याचे दागिने व रोख ३ लाख २८ हजार रुपये असा एकूण एक कोटी ७८ लाख २८ हजार रुपयांचा एेवज गोळा करून ते पसार झाले. चारपैकी दोन जणांनी शाखेतील महिला कर्मचाऱ्यावर बंदूक रोखून तिची दुचाकीची किल्ली घेत दुचाकीवर ते पसार झाले.

बातम्या आणखी आहेत...