आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोंदिया शहरात बनावटी साहित्य, वस्तू, फेव्हिक्विक विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना रंगेहात पकडून ८ हजार ८९० रुपयांचे फेव्हिक्विक जप्त केले. तर याप्रकरणी पोलिसांनी एकूण चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात सेमिता लिगल अॅडव्होकेट अॅन्ड सॉलिसिटरचे टिम लिडर मो. तौकीर मो. कालेखान चौधरी वय २८, रा.जे.जे.कॉलनी वजीरपूर अशोक विहार, उत्तरप्रदेश दिल्ली यांनी कंपनीतर्फे न्यायिक काम पाहण्याकरता प्राधिकृत केल्याचे कळवून पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला तक्रार नोंदवली होती. सेमिता लिगल फर्म, नोएडा, दिल्ली पिडीलाईट कंपनीशी टायअप असून पिडीलाईट कंपनीच्या माध्यमाने सर्व लिगल वस्तू या फर्मतर्फे पाहिले जातात. पिडीलाईट कंपनीच्या नावाने काही दिवसांपासून गोंदिया येथे बनावटी वस्तू, तसेच साहित्य तयार करून विक्री केली जात असल्याबाबत व बोगस फेव्हिक्विकच्या विक्रीमुळे कंपनीचे नुकसान होत असल्याचे सांगितले होते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी पथकासह या बाबीची संपूर्ण शहानिशा करून सायंकाळी बजाज ट्रेडर्सचे मालक श्याम मोहनलाल बजाज, दीपक बच्चुमल लिलवानी व विवेक हरिशंकर गुप्ता यांना बनावट फेव्हिक्विक विक्री करताना तसेच दुकानात बाळगताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. तसेच बजाज ट्रेडर्स दुकानातून २३९५ रुपयांचे ४७९ नग फेव्हिक्विक व तसेच घरून ६४९५ रुपयांचा असा एकूण ८ हजार ८९०रुपयांचा पिडीलाईट कंपनीचे नावाचे बनावटी फेव्हिक्विक ट्युब माल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान प्रकाश खत्री रा. बिलासपूर (छत्तीसगड) हा गोंदिया येथे आपल्यासह इतरांनासुध्दा बनावटी माल पुरवत असल्याची माहिती तिघांनी दिल्याने त्याच्याविरुद्ध कॉपीराईट अॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.