आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात नेहमीच वाघाचे दर्शन होते. लोकांच्या घरापर्यंत वाघ आल्याच्या घटना घडल्या आहे. मंगळवारी धुळवडीच्या दिवशी कळपातील एका म्हशीला एकटे गाठून तिची शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाघाला कळपातील इतर म्हशींनी उलट हल्ला करीत पळवून लावले. समाजमाध्यमावर झपाट्याने व्हायरल झालेला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. केंद्राच्या सीसीटीव्हीत हा प्रसंग चित्रीत आला आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रातील वाघाच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. या परिसरात अनेकांना वाघाने दर्शन दिले आहे. तसेच वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत या परिसरात चार जणांचा बळी घेतला आहे. या परिसरात वाघ, बिबट्या व अस्वलाची दहशत आहे. मंगळवारी धुळवडीच्या दिवशीही वीज निर्मिती केंद्र परिसरातील प्रवेशद्वाराजवळ काही म्हशी चाऱ्याच्या शोधात फिरत होत्या.
एकीचे बळ
कळपापासून मागे राहिलेल्या म्हशीला वाघ घेरले. शिकारीच्या शोधात असलेल्या वाघाने या म्हशीवर हल्ला करीत तिला खाली पाडले. तिच्या मानेत जबडा रूतवून मारणार तितक्यात कळपातील पाच ते सहा म्हशींनी अत्यंत त्वेषाने वाघाच्या दिशेने धाव घेतली. वाघाला हे अनपेक्षित होते. अचानक आपल्या दिशेने पाच ते सहा म्हशी येत असल्याचे पाहून वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. म्हशींनी शेवटपर्यत वाघाला पळवून लावले.
सोशल मिडीयावर व्हिडीयो चर्चेत
या घटनेचे संपूर्ण दृश्य वीज निर्मिती केंद्र परिसरात लावण्यात आलेल्या कॅमेरामध्ये चित्रित झाले आहे. शिकारीत तरबेज असलेला वाघाला म्हशीनी पळवून लावले. सध्या म्हशी व वाघाचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच हिट झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.