आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:ऑक्टोबरमध्ये होणारी व्याघ्र प्रगणना पेपरलेस, एमएस ट्रायपेस इकॉलॉजिकल ॲपचा ऑफलाइन केला जाणार वापर

गडचिरोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण भारतात दर चार वर्षांनी होणाऱ्या व्याघ्र प्रगणनेला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होणार असून भारतात प्रथमतः ही प्रगणना एम एस ट्रायपेस इकॉलॉजिकल ॲपच्या साहाय्याने होणार असून, यात कुठेही कागदावर नोंदी घेण्याची तसदी घ्यावी लागणार नाही. राष्ट्रीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने व्याघ्र प्रगणननेसाठी इकाॅलाॅजिकल हा ऑफलाइन ॲप तयार केला आहे. मोबाइलमध्ये हा ॲप डाऊनलोड करून घेतल्यानंतर या ॲपच्या साहाय्याने व्याघ्र प्रगणना केली जाणार असल्यामुळे ही खऱ्या अर्थाने पेपरलेस व्याघ्र प्रगणना ठरणार आहे.

यापूर्वी २०१८ मध्ये प्रगणना झाली होती. व्याघ्र गणना आणि प्रगणना यात थोडे अंतर आहे. व्याघ्र गणनेत केवळ वाघांची मोजणी केली जाते. तर व्याघ्र प्रगणनेत पट्टेदार वाघांसह, मांसभक्षी, तृणभक्षी प्राणी गणना तसेच त्यांच्या अधिवासाचे संनियंत्रण करण्याच्या प्रक्रियेचा समावेश आहे. मुख्यतः व्याघ्र राज्यांमध्ये ही कार्यपद्धती राबवली जात असून राज्याचे वन विभाग, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था हे संयुक्तपणे हा कार्यक्रम राबवतात. २ ते ८ ऑक्टोबर हा भारतीय वन्यजीव सप्ताह संपल्यानंतर या प्रगणनेची सुरुवात होईल. राज्याच्या वन विभागाने अद्याप तरी त्याचा कार्यक्रम घोषित केलेला नाही.

एकूण ४ टप्प्यात ही प्रगणना होऊ घातलेली आहे. पहिल्या टप्प्यात मांसभक्षी प्राण्यांच्या ओळखचिन्हांचे सर्वेक्षण, ट्रान्सेक्ट रेषेवरील प्रगणना, अधिवासाची गुणवत्ता, मानवी हस्तक्षेपाची माहिती व प्राण्यांच्या विष्ठांचे सर्वेक्षण हे स्थानिक वन विभागाद्वारे नियतक्षेत्र/बीट स्तरावरून करावयाचे आहे.

दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण भारतीय वन्यजीव संस्थे मार्फत केले जाते. तिसऱ्या टप्प्यात मागील व्याघ्र प्रगणनेनंतरच्या चौथ्या वर्षी व्याघ्र प्रकल्प व काही निवडक वन विभागांमध्ये सर्वेक्षण करण्यात येते. यात कॅमेरा ट्रॅपद्वारे वन्य प्राण्यांचे फोटो घेऊन ती माहिती इस्टिमेशनकरिता वापरली जाते. आणि चौथ्या टप्प्यात याच प्रणालीद्वारे काही निवडक संरक्षित क्षेत्र आणि व्याघ्र प्रकल्पामध्ये सखोल सनियंत्रणाकरिता याचा अवलंब केला जातो. गडचिरोलीतील विद्यमान मानव वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वडसा आणि गडचिरोली वन विभागात व्याघ्र प्रगणना विस्तृत प्रमाणावर करण्यात येणार असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नवीन ॲप करणार चमत्कार
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतीय वन्यजीव संस्था व राष्ट्रीय व्याघ्र प्रगणना पेपरलेस करतानाच इकोलाॅजिकल्स नावाचा अॅप निर्मिती करून दऱ्या-खोऱ्यात हा ॲप ऑफलाइन पद्धतीने अचूक माहिती गोळा करण्यास क्षणात उपलब्ध होणार आहे. रिमोट सेन्सिंग डाटा वापरून भारतीय वन्यजीव संख्या यावर प्रक्रिया करत असते. या अॅपद्वारे सर्वेक्षण अधिकाऱ्याला प्रथम नोंदणी करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...