आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा12 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी बफर वन क्षेत्रात वाघाची शिकार झाल्याचा गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात आजतागायत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या सर्व आरोपी मध्यवर्ती कारागृहात आहे. आरोपींकडून मिळालेली माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे. त्यावरून वाघाची हत्या अंधश्रद्धेतून झाली असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
यातील काल अटक केलेल्या जितेंद्र वरखडे या आरोपीने गुन्ह्यात वापरलेले एक हत्यार दाखवले. त्याला वन विभागाने जप्त केले. ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींना मंगळवारी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, रामटेक यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आजपर्यंत झालेल्या तपासात आरोपींनी विजेच्या तारांचा करंट लावून वाघाची शिकार केल्याचे व नंतर मृत शरीर कापून पंजे, कवटी, मिश्या, काही हाडे व दात काढले असल्याचे निष्पन्न झाले आहे. वाघाच्या अवयवाचा वापर अंधश्रध्देच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी केला असण्याची तसेच इतरांना विक्री केल्याची शक्यता आहे. यातील एका आरोपीची ऑनलाईन वेबसाईट वरती "प्लेबॉय" म्हणून नोंदणी असल्याने या प्रकरणात अजून काही शक्यता पडताळण्यात येत आहे.
या प्रकरणात पुढील तपास ए. श्रीलक्ष्मी, सहायक वन संरक्षक अतुल देवकर आणि जयेश तायडे यांच्यासह इतर कर्मचारी करीत आहेत. कायदेविषयक बाबतीत विधी सल्लागार कवीता भोंडगे यांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. अनेकदा तारुण्य आणि जोश प्राप्तीसाठी वाघाची शिकार केली जाते. या प्रकरणी असे काही आहे का? या दिशेने तपास करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.