आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याच मित्राची धारदार चाकूने हत्या:जंगल भ्रमंती करताना दारूच्या नशेत टिंगल केल्याने मित्राची हत्या

भंडारा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मद्यप्राशन करून जंगल भ्रमंती केली. मात्र त्यानंतर टिंगल टवाळकी केल्याच्या कारणावरुन मित्रांमध्ये वाद झाला. यातून दाेघांनी आपल्याच मित्राची धारदार चाकूने हत्या केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि अड्याळ पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीतील माडगी - तिर्री (मिन्सी) मार्गावरील जंगलात घडली. कुशल सुरेशराव भरणे (२७, रा. भंडारा) निखिल हुमदेव मेश्राम (२१ रा. भंडारा) अशी आराेपींची नावे आहेत. तर बाळा उर्फ राकेश रामभाऊ कोवे (२७ रा. भंडारा) असे मृताचे नाव आहे. हे तिघेही रविवारी जंगल भ्रमंतीसाठी गेले हाेते. जंगल परिसरात तिघांनीही मद्यप्राशन केले. मात्र त्याचवेळी वाद झाला. आरोपी कुशलला त्याची चिड आली. त्यानंतर तो घरी परतला. घरून चाकू घेतला आणि पुन्हा जंगल परिसरात तिघेही गेले. पुन्हा वाद उरकून काढत, कुशलने राकेशवर चाकूने सपासप वार केले.

बातम्या आणखी आहेत...