आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाऐवजी सेवेला निवडले:कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी नागपुरातील महिलेने मोडले लग्न, म्हटले - मला रुग्णांच्या वेदना पाहावल्या जात नाहीत

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्यावर्षी झाले होते वडिलांचे निधन

नागपुरातील एका महिला डॉक्टरने कर्तव्य आणि रुग्णांच्या सेवेसाठी आपले लग्न मोडले. नागपुरातील सेंट्रल इंडिया कार्डिओलॉजी हॉस्पटिलमध्ये फिजीशियन म्हणून काम करत असलेल्या अपूर्वा मंगलगिरींचे लग्न 26 एप्रिलला होणार होते. संक्रमणाचा वाढता धोका आणि आपले कर्तव्य पाहता अपूर्वाने लग्न पुढे ढकलण्यास सांगितले, मात्र मुलाकडच्या मंडळीने मान्य केले नव्हते. यानंतर अपूर्वाने लग्न करण्यास नकार दिला. तिचे म्हणणे होते की, सध्या कोरोना रुग्णांच्या सेवेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. इतर कामांसाठी संपूर्ण आयुष्य पडले आहे.

गेल्यावर्षी झाले होते वडिलांचे निधन
अपूर्वा म्हणाली की गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तिच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तिने सांगितले की, 'मी अशा कुटुंबाची असहायता आणि वेदना समजू शकते. मला दररोज गरजूंचे कॉल येतात, ते अंथरुणावरुन ऑक्सिजनपर्यंत मदत मागतात. ' अपूर्वा म्हणते की, 'एक consultant physician असल्याच्या नात्याने मला दिवसभर अनेक फोन कॉल येत असतात. लोक निराश आणि रागात माझ्याशी बोलतात. एक बेड आणि एक ऑक्सिजन सिलेंडरसाठी ते माझ्या समोर हात जोडतात. अनेक वेळा मी केवळ असहाय होऊन त्यांचं फक्त ऐकते.'

वर्तमान काळानुसार टफ होते डिसीजन
अपूर्वाने सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा तुटवडा आहे. मी माझा प्रत्येक मिनिट केवळ कोविड रुग्णांसाठी मदतीसाठी देऊ इच्छिते. लग्न मोडण्याच्या निर्णयावर अपूर्वाने म्हटले की, हा निर्णय कठीण होता, कदाचित भविष्यात हा चुकीचाही ठरु शकतो, मात्र वर्तमान काळाच्या हिशोबाने मी टफ डिसिजन घेतला आहे.

'मला नाही वाटत की, माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 20-25 लोकांनी संक्रमित व्हावे' अपूर्वाने पुढे सांगितले की, 'या महामारीच्या काळात आपण रुग्णालयात बेड, ऑक्सिजन सिलेंडर, औषधी, व्हेंटिलेटर, डॉक्टर आणि नर्सच्या तुटवड्याचा सामना करत आहोत. अशा वेळी माझ्या लग्नात 20-25 लोक सामिल व्हावे आणि ते दुसऱ्या दिवशी संक्रमित व्हावेत असे मला वाटत नाही.'

अपूर्वाच्या या निर्णयासोबत तिचे संपूर्ण कुटुंब
अपूर्वाच्या या निर्णयासाठी तिचे कुटुंब तिच्यासोबत उभे आहे. कुटुंबातील मुलीच्या या निर्णयाचा सर्वांना अभिमान आहे. अपूर्वाने सांगितले की, 'लग्नाच्या 10 दिवसांपूर्वी मी लग्न करण्याचा विचार सोडला होता. माझ्या रुग्णांना माझी गरज होती आणि माझ्या डोक्यात केवळ हेच सुरू होते. जेव्हा मी घरी याविषयी माझ्या आई आणि बहिणीसोबत चर्चा केली तर त्या आनंदाने माझ्यासोबत उभ्या राहिल्या. जर मी कोविड रुग्णांची सेवा करण्यात आनंदी असेल, तर त्यांनाही तेच हवे आहे.'

बातम्या आणखी आहेत...