आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नागपूर:आलमारीच्या ड्राॅवरमध्ये निघाला विषारी मण्यार ; मांजरीने केले होते सावध

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरातील पाळीव प्राण्यांना येणारे संकट वा धोका जाणवतो असे अनेकांचे अनुभव आहे. अनेकदा मांजर वा कुत्रा घरातील लोकांना सावध करतात. पण, त्याकडे दुर्लक्ष होते. असाच प्रकार येथील बेलतरोडी भागात घडला. या भागातील सुरेश फुलमाळी यांच्या कपाटाखाली साप दडून बसला होता. घरातील मांजरीला साप दिसताच कपाटाजवळ जाऊन गुरगरणे सुरू केले. परंतु घरातल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

शनिवारी, नागपंचमीच्या दिवशी सकाळी घर झाडत असताना आलमारीच्या खाली साप दिसताच घरच्यांची पाचावर धारण बसली. काल मांजर कपाटाखाली पाहून का गुरगुरत होती हे लक्षात आले. पशुकल्याण अधिकारी स्वप्निल बोधाने यांना याची माहिती देण्यात आली. तोपर्यत साप कपाटाच्या ड्राॅवरमध्ये शिरला होता. खोली रिकामी करून बऱ्याच वेळच्या प्रयत्नांनंतर साप पकडण्यात यश आले.

निशाचर असलेला मण्यार खूप विषारी असून तो रात्रीच्या वेळेसच बाहेर निघतो. जमिनीवर झोपणाऱ्यांना चावण्याच्या घटना जास्त आहे. मण्यार चावल्यानंतर पोटात खूप दुखते तसेच खूप तहान लागते. या शिवाय श्वास घेण्यास त्रास होतो. साप चावल्यानंतर जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र वा दवाखान्यात न्या, असे आवाहन बोधाने यांनी केले आहे.