आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राला जेवायला घरी बोलावले अन् पत्नीचे दागिने लांबवले:सीसीटीव्हीने उघडले बिंग, पोलिसांनी ठोकल्या संशयिताला बेड्या

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कान्होबाचे जेवायला एक दाम्पत्य मित्राच्या घरी गेले. दाम्पत्य येताच पत्नीच्या अंगावर दागिन्यांची रास पाहिली अन् मित्र भुरळुन गेला. हे दागिने हडपायचे असे मनोमन ठरवले अन् दाम्पत्याच्या घरी जात नकळत हात साफ करुन पसारही झाला, पण हे बिंग सीसीटीव्हीने फोडले अन् संशयित मित्राला दाम्पत्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादीचा मित्र कैलास निमजे आहे. त्याने फिर्यादी आणि त्याच्या पत्नीला कान्होबाचे जेवायला घरी बोलवले. त्यानंतर दाम्पत्य 19 ऑगस्ट रोजी कैलास निमजे याच्या घरी गेले होते. जेवण केल्यानंतर ते रात्री 11. 30 वाजता घरी परतले. त्यानंतर फिर्यादीची पत्नी अंगावरील दागिने काढून ते आलमारीत ठेवण्यासाठी गेले असता आलमारीच्या लाॅकरला चाबी लागलेली दिसून आली. तिने लाॅकरची पाहाणी केली असता जूनी सोन्याची मोहनमाळ, दोन सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी असलेला डबा दिसून आला नाही.

गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी वैशालीनगर, आंबेडकरनगर गार्डन, मेहंदीबाग पुल आदी ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता पांढऱ्या रंगाच्या अ‌ॅक्टिव्हावर एक संशयीत व्यक्ती जाताना दिसली. त्याने अंगात पांढरा शर्ट व काळी पँट घातली होती. तो सिटीप्लाजा अपार्टमेटमध्ये जाताना दिसला. त्यावरून त्याच्या चौकशीसाठी पथक पाठविले. गुप्त बातमीदाराकडून संबंधित व्यक्ती कैलास निमजे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी निमजे यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

असा लागला छडा

चोरी झाल्यानंतर सीसीटीव्हीवरून पोलिसांनी शाेध सुरु केला. चोर ज्या मार्गाने गेला त्या मार्गावरील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले, तेव्हा चोर तो सिटीप्लाजा अपार्टमेटमध्ये जाताना दिसला. तेथेच दाम्पत्य जेवायला गेल्यानंतर त्यांना आणि पोलिसांनाही मित्रावरच संशय आला, त्याची चौकशी केल्यानंतर त्याने चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.

बारा तासांत छडा

अवघ्या बारा तासात पोलिसांनी चोरट्याचा शोध लावून मुद्देमाल परत केल्याने पोलिसांचे कौतुक केले आहे. पाचपावली पोलिसांनी ही कामगिरी केली. कैलास प्रभाकर निमजे (वय 39) असे या संशयिताचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...