आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांमध्ये खळबळ:ईडीची छापेमारी केलेले व्यापारी परदेशात पाठवायचे सुपारी, नागपुरात तीन बड्या व्यापाऱ्यांवर छापे

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंमलबजावणी संचालनालय, ईडीने गुरुवारी नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांकडे छापेमारी केल्यामुळे नागपुरसह मध्य भारतातील सुपारी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. शहरातील सुपारीकिंग छटवाल याला आसाम पोलिसांनी अटक केल्याच्या बातमीनंतर प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशू भद्रा आदींवरही छापे मारल्याने सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.छापेमारी केलेले सर्व व्यापारी परदेशात सुपारी आयात करणारे आहेत. यापूर्वीही ते वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले होते. ईडीच्या पथकात मुंबईसह इतर शहरातील अधिकारी होते. या छापेमारीची बातमी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरल्याने इतर सुपारी व्यापारी सावध झाले. नागपुरात सुपारी व्यापाऱ्यांकडे धाडी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १ जुलै २०२१ रोजी सीबीआयने नागपुरातील तीन सुपारी व्यापाऱ्यांकडे धाडी घातल्या होत्या. १५ हजार कोटींचा घाेटाळा असल्याच्या संशयावरून नागपुरातील ३ व्यापाऱ्यांकडे धाडी घालत दस्तावेज ताब्यात घेतले होते. धाडी घातलेल्या व्यापाऱ्यांमध्ये मोहंमद रजा अब्दुल गनी तंवर, बुरहान अख्तर, हिमांशू भद्रा यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...