आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 महिन्याच्या बाळासह आई ठार!:ट्रेलर- दुचाकी अपघातातात जागीच गेला जीव, नागपूर ग्रामीणमध्ये 2 अपघात एकूण 3 ठार

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर ग्रामीणमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले. यामध्ये मौदा येथील ट्रेलर-मोटर सायकलच्या धडकेत तीन महिन्याच्या चिमुकलीसह आई ठार झाली. या घटनेने संतप्त जमावाने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला शांत केले.

मौदा येथील राष्ट्रीय महामार्गावरील रबडीवाला टि-पाँईंटवर मोटर सायकलस्वार रोड क्रॉस करीत असताना भंडाऱ्याकडून विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरने दिलेल्या जबर धडकेत तीन महिन्यांची चिमुकली पार्थवीसह तिची आई प्रांजल राजहंस वाघमारे (22 वर्ष) हे जागेवरच ठार झाले. तर मोटर सायकलस्वार राजहंस किसन वाघमारे (28) व त्याची आई अंजना किसन वाघमारे (45) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचार करीता हलवले आहे.

घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी पोलीस स्टाफसह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. अपघातातील मृत आणि जखमी कुही तालुक्यातील चिकना येथील रहिवासी आहेत. ते मोटरसायकल (क्र. एमएच-40/सीए-2926) ने पत्नी, चिमुकली व आई असे चौघे जण मौदा येथील परमात्मा एक आश्रमात जात असताना रबडीवाला टिपाँईंटवर रोड क्रास करताना भंडारा कडून येणाऱ्या ट्रेलर क्रं. जीजे-12/बीएक्स-3423) या ट्रेलरनी जोरदार धडक दिल्याने अपघात घडला.

अपघातानंतर लोक संतप्त झाले होते. गर्दी खूप जमली होती व रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. रबडीवाला टिपाँईंटवर ओव्हर ब्रिज झालाच पाहिजे अशी मागणी केली. मौद्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी लोकांना समजावून सांगितल्या नंतर लोकांनी ऐकले व रस्ता रोको करण्याचे टाळले.

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

गुरूवारी झालेल्या अन्य एका अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पारडी रोडवरील आपल्या शेतातून घरी परत येत असताना मांढळ-उमरेड मार्गावरील दूध डेअरीजवळ झालेल्या अपघातात स्प्लेंडर दुचाकीचालकाचा घटनास्थळावर जागीच मृत्यू झाला. नामदेव मेश्राम वय (47) हे मृतकाचे नाव आहे. ते सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास पारडीवरून आपल्या शेतातून घरी परत येत असताना दूध डेअरी जवळील वळणावर एमएच 49, वाय 7155 या विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव दुचाकीने एमएच 40, एच 3402 क्रमाकांच्या हीरो होंडा स्प्लेेंडरला समोरासमोर धडक दिली. यात स्प्लेंडर चालक नामदेव मेश्राम गंभीर जखमी झाले.

त्यांना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास बिट जमादार सुधीर ध्यानगोलवार करीत आहेत. एमएच 49, वाय 7155 क्रमाकांची गाडी देवेंद्र नाईक हे चालवित होते.

बातम्या आणखी आहेत...