आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयातील अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘क्षेत्रभेटी’अंतर्गत मालेगाव तालुक्यातील अमानी या आदिवासी बहुल गावाला भेट दिली. क्षेत्रकार्य समन्वयक तथा विषय शिक्षक प्रा. डॉ. प्रसेनजित चिखलीकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वाहाणे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गावातील आदिवासी बांधवांच्या समस्या, तसेच शासनाच्या विविध विकास योजनांबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी गावफेरी काढत गावात बिबे फोडून त्यातून गोडंबी काढणाऱ्या आदिवासी महिलांच्या जाणून घेतल्या.
यावेळी डॉ. चिखलीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदिवासी अजूनही विकासापासून दूर असल्याचे सांगितले. प्रास्ताविक मीनाक्षी सानप या विद्यार्थिनीने केले. गावातील सरपंच अनिल जाधव यांनी गावाची व आदिवासी समुदायाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी प्रा.डॉ. प्रसेनजित चिखलीकर यांनी आदिवासी समुदायाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक समस्या तसेच त्यांची व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, उद्योग- व्यवसाय, बोलीभाषा याविषयी विद्यार्थ्यांना सखोल व मोलाचे असे मार्गदर्शन केले.
यावेळी गावातील आदिवासी भागातील सोयी सुविधा, लघुउद्योग, महिला बचत गट यात प्रामुख्याने आदिवासी महिलांचा बिब्याची गोडंबी फोडण्याचा गृह उद्योगाला विद्यार्थ्यांनी भेट दिली व याची संपूर्ण माहिती मिळवली. तसेच त्या महिला कोणतेही सुरक्षेचे आधुनिक साधने वापरत नसल्यामुळे या उद्योगाचा त्यांच्या आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होतो हे जाणून घेतले. तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, सामाजिक कार्यकर्त्यांच्या साहाय्याने व ग्रामपंचायत मार्फत विविध प्रकल्प व शबरी योजना राबवण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पट्टेबहादूर या विद्यार्थाने, तर आभार प्रदर्शन पायल सरकटे या विद्यार्थिनी केले. यावेळी एम.एस.डब्ल्यू. अंतिम वर्षाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.