आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Tricolor Rally In The Narmada River, Dense Forest On One Side And River On The Other The Tribal Brothers Hoisted The Flag Enthusiastically

नर्मदेच्या पात्रात तिरंगा रॅली:एका बाजूला घनदाट जंगल दुसरीकडे नदी, आदिवासी बांधवांनी उत्साहात केले ध्वजारोहण

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात तिन्ही बाजूला नर्मदा नदीचे पाणी आणि एका बाजूला घनदाट जंगल आहे. मात्र या अवघड परिस्थितीतही ग्रामस्थांनी देशभक्तीची एक नवी व्याख्या निर्माण केली आहे. नदीत बोटींचा वापर करुन तिरंगा रॅली काढण्यात आली. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या समोरील जलाशयात तिरंगा रॅली निघाल्याने महापुरुषांचा पुतळ्यासमोर अनोखा स्वातंत्र दिवस आदिवासींनी साजरा केला

नंदुरबार जिल्ह्यातील मणिबेली व चिमलखेडी, सिंधुरीधनखेडी, चीचखेडी, अटटी, गमन हे राज्याच्या उत्तर टोकावर महाराष्ट्राच्या सातपुडा व गुजरात राज्याच्या विंध्य पर्वतरांगांमध्ये वसलेले गाव आहेत. याठिकाणी बिकट भौगोलिक परिस्थिती आहे. गावाला तिन्ही बाजूने नर्मदा नदीचा वेढा आहे. तर एका बाजूने घनदाट जंगल आहे. अशा बिकट परिस्थितीत 472 आदिवासी लोक वास्तव करत असून एकूण 78 घरे आहेत.

आदिवासी बांधवांचा उत्साह

या परिस्थितीत स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. या गावाला पुरेसा भूभाग नसल्याने नदीपात्रात उतरून अनोख्या पद्धतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. यात 27 बोटींचा समावेश होता. त्यात तिरंगा फडकवत भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत गावाला वळसा मारत तिरंगा रॅली काढली.

जलाशयात बोट रॅली

गुजरात महाराष्ट्र व मध्य प्रदेश च्या सीमेवरील सरदार सरोवर प्रकल्प परिसराती नोंदणीकृत मच्छीमारानी अनोख्या रीतीने स्वातंत्र्य दिवस साजरा केला. अक्कलकुवा, धडगाव येथील मच्छीमार सभासदांनी सरदार सरोवर जलाशयात बोट रॅली काढली. मत्स्य विभागाचे अधिकारी किरण पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

बातम्या आणखी आहेत...