आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोल राजकारण:फडणवीसांना ट्रोलिंगवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली; भाजपकडून पोलिसांत तक्रार, आधी राष्ट्रवादी म्हणे भूतकाळ पाहा

नागपूर2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर लाइव्ह येताच ट्रोल होत आहेत फडणवीस आणि त्यांचे माजी मंत्री

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इंटरनेटवर ट्रोल केल्या जाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भारतीय जनता पक्षाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. विनाकारण माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते फडणवीस यांना अनुसरून धमक्या दिल्या जात असल्याचे कथित आरोप भाजप करत आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनच्या काळातही फडणवीस आणि भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध खोट्या खटल्यांची माहिती सोशल मीडियावर पसरवली जात आहे असेही भाजपने म्हटले.

लाइव्ह येताच ट्रोल होत आहेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहर अध्यक्ष प्रविण दटके यांनी सोमवारी पोलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडे ही तक्रार दाखल केली. अशाच स्वरुपाची तक्रार मंगळवारी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी देखील रत्नागिरी पोलिस अधीक्षकांकडे दाखल केली आहे. देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर लाइव्ह येताच त्यांना ट्रोल केले जात आहेत. खोटे मेसेज आणि कमेंट टाकल्या जात आहेत असे त्यांनी आपल्या तक्रारींमध्ये म्हटले आहे. एका विरोधीपक्ष नेत्याला अशा स्वरुपाच्या धमक्या मिळत असतील तर सामान्य नागरिकांचे काय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे विधान परिषद सदस्य अनिल सोले यांनी सुद्धा फडणवीस यांना ट्रोल करण्यावरून संताप व्यक्त केला. त्यांना ट्रोल करत असताना अतिशय वैयक्तिक टीका केल्या जात आहेत असेही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून केवळ फडणवीसच नव्हे, तर त्यांच्या कार्यकाळात मंत्री राहिलेले चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटलांसह अनेकांना ट्रोल करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. ही नेते मंडळी सोशल मीडियावर लाइव्ह येताच ट्रोलिंग करण्यास सुरुवात होत आहे. भाजपच्या नेत्यांना मुद्दाम विरोधी विचारांचे पक्ष टार्गेट करत आहेत असे या नेत्यांचे म्हणणे आहे. 

राष्ट्रवादीचे नेते भाजपला म्हणतात, जरा भूतकाळ आठवा!

राजकीय नेत्यांना ट्रोल केले जाण्याची गोष्ट काही नवीन नाही. अनेक स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना सुद्धा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. नुकतेच राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका अभियंत्याला मारहाण केली. त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांना ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले. राष्ट्रवादीचे आणखी एक नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला भूतकाळ आठवण्याचा सल्ला दिला आहे. भाजपची सत्ता असताना मला आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आले होते. पोलिसांत तक्रार करून सुद्धा काहीच कारवाई झाली नाही. ट्रोल करणारे हँडलर प्रामुख्याने तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप यांचे समर्थक होते असा आरोप पाटील यांनी केला. भाजपने किती ट्रोलर्सला पैसे दिले ते आधी स्पष्ट करावे असा पलटवार पाटील यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत ट्रोल करणाऱ्या 341 जणांविरुद्ध गेल्या आठवडाभरात खटले दाखल केले आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्सच्या आकड्यानुसार, महाराष्ट्रात 2016 मध्ये सायबर क्राइमचे 2,380 खटले, 2017 मध्ये 3,604 खटले आणि 2018 मध्ये 3,511 खटले दाखल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...