आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:वर्धा मार्गावर रेतीच्या ट्रकने कारला उडविले, आयटी कंपनीतील 4 कर्मचारी ठार तर एक गंभीर जखमी

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रात्रपाळी आटोपून पाचही जण कंपनीतून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला

नागपुरातील वर्धा मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये कार चालक बालचंद्र उइके, पीयूष टेकाडे, नेहा गजभिये व पायल कोचे यांचा समावेेश आहे. नागपुरातील वर्धा मार्गावर खापरी नजीक असलेल्या मिहान उड्डाण पुलानजीक शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले चारही जण बुटी बोरीच्या मिहान औद्योगिक क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीचे कर्मचारी आहेत.

रात्रपाळी आटोपून हे पाचही जण कंपनीतून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. वर्धा मार्गावरून नागपूरकडे येत असताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या रेतीच्या ट्रकने या पाच जणांच्या कारला उडविले आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्व चारही जण २५ ते ३५ वयोगटातील आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सचिन बबन सुटे याच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम २७९, ३३८, ३०४ (अ), मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser