आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कत्तलखान्याकडे जाणारा ट्रक पकडला:जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला

गोंदियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा ट्रक आमगाव पोलिसांनी १ नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास पकडला. आमगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी रात्रीला गस्तीवर होते. गुप्त माहितीच्या आधारावर आमगाव- सालेकसा मार्गावर नाकाबंदी करताना ट्रक क्र. एम.एच.४० सी.डी. ९४७२ हा ट्रक आमगावमार्गे सालेकसाकडे जाताना आढळून आला. चालकाने ट्रक थांबवून चालकास विचारपूस केली असता अवैध पद्धतीने जनावरांची तस्करी होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तेव्हा ट्रकचालक व आणखी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले व ट्रक पोलिस स्टेशनमध्ये जमा केला. पाहणी केली असता या ट्रकमध्ये कत्तलखान्याकडे नेण्यात येत असलेली २३ जनावरे आढळली. या २३ जनावरांची किंमत ४.२० लाख रुपये सांगण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रक चालकावर प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून कारवाईत जप्त केलेली जनावरे सालेकसा तालुक्यातील धानोली येथील श्री गुरुदेव बहुउद्देशीय सेवा अनुसंधान केंद्रात (गौशाळा) ठेवण्यात आली आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक हांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई बोपचे, एनपीसी दानवे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...