आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबसपाचे माजी जिल्हाध्यक्ष दुर्वास भोयर यांनी त्यांच्या मुलीच्या दुर्घटनेप्रकरणी अपहरण, हत्या व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी गुरुवारी चक्क पोलिसांच्या वाहनासमोर आडवे झोपून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ माजली आहे. या घटनेने गोंदियात तणावाचे वातावरण असून भोयर दांपत्याला पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. रामनगर पोलिस पैसे घेऊन फक्त अपघाताचा गून्हा दाखल करून प्रकरण दाबत असल्याचा आरोप दुर्वास भोयर यांनी केला आहे. या घटनेचे अनुचित पडसाद उमटू नये म्हणून तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
भोयर यांच्या म्हणण्यानुसार त्यांची 14 वर्षीय मुलगी 12 जानेवारीला मित्रांसोबत फिरायला गेली असता घरी परत आली नाही. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर 16 जानेवारी रोजी भागवतटोलाजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिला गंभीर जखमा होत्या. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलिसांत केवळ अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आरोपींवर अपहरण, बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी गुरुवारी भोयर दांपत्याने गोंदिया शहरातील डाॅ. आंबेडकर चौकात चालत्या पोलिस गाडीसमोर झोपून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच उचलल्यामुळे प्रयत्न फसला. या घटनेमुळे गोंदियात तणावाचे वातावरण असून भोयर दांपत्याला पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.