आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:शवविच्छेदनगृहात अडीच वर्षाच्या चिमुकल्याच्या मृतदेहाचे उंदरांनी तोडले लचके

वर्धा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समुद्रपूर तालुक्यातील रेणकापूर येथील अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आलेल्या मृतदेहाचे तेथील  असलेल्या उंदरांनी लचके तोडले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

रेणकापूर येथील प्रथम उर्फ गणेश राजू निखाडे वय अडीच वर्ष हा चिमुकला खेळत असते वेळेस त्याचा पाण्याच्या टाकीत  दिनांक १२ जून रोजी पडला असल्याने, त्याच्या वडिलांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन झाल्या शिवाय मृतदेह मिळणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले,अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला होता. दिनांक 13 जून रोजी शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांनी मृतदेह बाहेर काढला असता, त्या मृतदेहाचे उंदरांनी लचके तोडले असल्याचे दिसून आले. चिमुकल्याच्या मृतदेहाचे लचके तोडले असल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांना मिळताच रुग्णालयात तणावाचे वातावरण पसरले होते. दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तहसीलदार यांच्या मध्यस्थीने तणावाचे वातावरण निवळण्यात आले. या प्रकरणी समितीची नेमणूक करण्यात येणार त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितल्यानंतर कुटुंब मृतदेह घेण्यास तयार झाले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...