आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:नागपुरातील उंटखाना परिसरातील चारचाकी जळीत प्रकरणी दोघांना अटक

नागपूर4 महिन्यांपूर्वीलेखक: अतुल पेठकर
  • कॉपी लिंक
  • यापूर्वीही नागपुरात घराबाहेर पार्क केलेली वाहने जाळण्याचे प्रकार घडलेले आहे

नागपुरातील उंटखाना परिसरात असलेल्या नागरी वस्तीत काही अज्ञात समाजकंटकांनी शनिवारी मध्यरात्री घराबाहेर पार्क केलेली पाच ते सहा चारचाकी वाहने जाळली होती. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, इमामवाडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार मुकुंद साळुंके यांनी स्वत: घटनास्थळाला भेट दीली होती. त्या नंतर गुन्हे शाखेच्या यूनिट क्र. ४ ने तपास चक्रे वेगाने फिरवित शंभू गंगाप्रसाद मंडल (वय २४) व विशाल पुरूषोत्तम राऊत (वय १९) या दोघांना अटक केली. नंतर त्यांना इमामवाडा पोलसांच्या स्वाधीन करण्यात आले. दाेघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

यापूर्वीही नागपुरात घराबाहेर पार्क केलेली वाहने जाळण्याचे प्रकार घडलेले आहे. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री २ च्या सुमारास ही घटना घडली आहे उंटखाना परिसरातील दहिपुरा ले-आऊटमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना काही समाजकंटकांनी आगी लावल्या. दहा ते बारा गाड्या दहिपुरा भागात उभ्या होत्या. या पैकी तीन कार पूर्णपणे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कार जळाल्याचे लक्षात आल्यावर तेथील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात काही कारचे नुकसान होण्यापासून टळले.

बातम्या आणखी आहेत...