आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरच्या कन्हान नदीत बुडून दोघांचा मृत्यू:पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू, अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमाला गालबोट

नागपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मौदा येथील कन्हान नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. राहुल दशरथ ठोंबरे (वय 25) व उमेश श्रावण ठाकरे (वय 26) अशी मृतकांची नावे आहे. मिळालेल्या माहिती नुसार मौदा येथील अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमासाठी दोघे आले होते. कार्यक्रम आटाेपल्यानंतर त्यांना कन्हान नदीत पोहण्याचा मोह झाला. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही जण वाहून गेले.

मौदा येथील मातंग समाजाच्या वतीने साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन बुधवारला होते. या कार्यक्रमानिमित्त गोरेवाडा, नागपुरातून उमेश पांडुरंग बावणे (जावई) नामक व्यक्तीकडे कार्यक्रमानिमित्त आला होता. घटनेच्या दिवशी अंदाजे दोन वाजतादरम्यान कार्यक्रम सुरू असताना कन्हान नदीवरील दीप वास्तूजवळ पोहण्याचा बेत आखला. पोहण्यासाठी कपडे काढून नदीपात्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने राहुल पाठोपाठ उमेश वाहून गेला. घटनेची माहिती मौदा शहरात पसरली. स्थानिक तहसील प्रशासनाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तत्काळ, शोधमोहीम प्रारंभ केली. सायंकाळपर्यत दोघांचेही मृतदेह हाती लागले नव्हते. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे ठोंबरे व ठाकरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा आहे.

भेंडी तोडणाऱ्या महिलेवर वीज कोसळली

ग्रामीणमध्ये घडलेल्या अन्य एका घटनेत भेंडी तोडणाऱ्या महिलेवर वीज कोसळल्याची घटना घडली. सातनवरी शिवारात घडलेल्या घटनेत दुपारी तीन वाजताच्या सुमारास आलेल्या जोराच्या पावसात वीज कोसळल्याने महिला जागीच ठार झाली. उज्ज्वला सुरेश थुटुरकर (40) हे मृतक महिलेचे नाव आहे. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातनवरी (पादरी खापा) शिवारात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये ही घटना घडली. मृतक ही शेतातील घरी पती, मुलगा व कुटुंबासह राहायची. शेतात घर असल्याने कुटुंबातील उर्वरित सदस्य सुखरूप वाचले. अन्य एका घटनेत बाजारगाव येथील विनोद बाजनघाटे यांच्या घरावर वीज पडली. त्यांच्या घराचा एक भाग पूर्णत: तुटला आहे. त्याचबरोबर घरातील वीजपुरवठासुद्धा खंडित झाला. मात्र, कुठलीही जीवितहानी झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...