आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारादरम्यान मृत्यू:मृतदेहाला अग्नी देताना भाजलेल्या दोघांचा मृत्यू

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंत्यसंस्कारादरम्यान अग्नी देत असताना उडालेल्या भडक्याने अंत्ययात्रेत सहभागी झालेले तीन जण भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत गुरुवार, २८ रोजी घडली हाेती. शुक्रवारी सकाळी त्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुधीर महादेव डोंगरे (४५, नागसेननगर, कामठी) आणि दिलीप घनश्याम गजभिये (६०, रा. न्यू खलाशी लाइन, कामठी) अशी मृतांची नावे आहेत. राणी तलाव मोक्षधाम येथे ही घटना घडल्यानंतर वरील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला हलवण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार स्थानिक मोदी पडाव नागसेननगरातील सिद्धार्थ अंतुजी हुमने यांचा अपघाती मृत्यू झाल्याने गुरुवारी दुपारी कामठीच्या राणी तलाव मोक्षधामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृतदेहाला अग्नी देत असताना टेंभा लावताना डिझेलचा भडका उडाल्याने सुधीर महादेव डोंगरे (४५), सुधाकर बुधाजी खोब्रागडे (६०) व दिलीप घनश्याम गजभिये (६०) हे तिघे भाजल्याने गंभीर जखमी झाले हाेते. त्यांना उपचारासाठी कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यातील सुधीर डोंगरे व दिलीप गजभिये यांना नागपूरला हलवण्यात आले हाेते. डोंगरे व गजभिये यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...