आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खद वार्ता:खापरखेडा औष्णिक वीज केंद्रामध्ये मशीनखाली दबून दोन कर्मचारी जागीच ठार; गुन्हा दाखल

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

५०० मेगावॅट क्षमतेच्या खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कोल यार्ड परिसरात कोल स्ट्रॅकर मशीनचे वाकलेले बुम अचानक तुटून खाली पडल्याने त्याखाली दबून वीज केंद्रातील कर्मचारी व एका कंत्राटी कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १.३० वाजता घडली. दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मृतक वीज कर्मचाऱ्याचे नाव संतोष राजेश मेश्राम (२०, रा वंजारी भवन कोराडी) तर प्रवीण नारायण शेंडे (३२, जयभोले नगर, खापरखेडा) असे कंत्राटी कामगारांचे नाव आहे.

मृत संतोष हा अनुकंप तत्वावर आपल्या वडिलांच्या जागेवर एका वर्षांपूर्वी नोकरीवर लागला होता तर मृतक प्रवीण हा विवाहित असून त्याला एक मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेच्या दिवशी महाकाय कोल स्ट्रॅकर मशीनवर मृत संतोष मेश्राम हा चालक तर प्रवीण शेंडे हा सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. मध्यरात्री १.३० च्या दरम्यान कोल स्ट्रॅकर मशीनचे वाकलेले बुम अचानक खाली पडले. घटनेत संतोष व प्रवीणचा घटनास्थळावर मृत्यू झाला. शेवटी ग्रँडर मशीनने कोल स्ट्रॅकर मशीनचे पार्ट कापून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...