आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाची दहशत:विदर्भात 24 तासांत वाघांच्या हल्ल्यांमध्ये दोन जणांचा मृत्यू, आरमोरी, गडचिरोलीतील घटना

चंद्रपूर / गडचिरोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भात गेल्या २४ तासांमध्ये २ वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी आणि तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला.

अरसोड्यापासून एक ते दीड किमी अंतरावर आरमोरी (जि.गडचिरोली) शहरानजीक वडसा मार्गावर कोसा प्रकल्पाजवळ शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उन्हाळी धान पिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढवून त्यास ठार केले. नंदू गोपाळा मेश्राम (५०, रा. बर्डी वॉर्ड आरमोरी) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी पतीच्या आजारपणामुळे उन्हाळी धान पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिला शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते. या घटनेनंतर परिसरात तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी रविवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माकपचे गडचिरोली जिल्हा महासचिव अमोल मारकवार यांनी दिली.

चंद्रपुरात तेंदूपत्ता वेचणाऱ्या महिलेची शिकार
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बफर क्षेत्रातील सीतारामपेठ येथील जयश्रीया रिसोर्टच्या मागील बफर प्लँटेशनमध्ये वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजता घडली. जाईबाई माधव जेंगठे (६६, रा. मोहर्ली) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेली होती.

बातम्या आणखी आहेत...