आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपुरात ओमायक्रॉन 'बीए.5' व्हेरिएंटच्या दोन रुग्णांची नोंद झालेली आहे. कोरोनाबाधित दोन रुग्णांना ओमायक्रॉन 'बीए.5' व्हेरिएंटची लक्षणे आढळलेली आहेत. यामध्ये 45 वर्षीय महिला आणि आणि 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
दोन्ही रूग्णांचा बाहेरगावच्या प्रवासाचा इतिहास आहे. यातील 27 वर्षीय पुरुष हा केरळहून 4 जूनला नागपुरात आला होता. तर दुसरी 45 वर्षीय महिला ही मुंबईहून 6 जूनला नागपुरात परतली होती. दोघांनाही सर्दी, खोकला, तापसह इतर लक्षणे असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांना कोरोनाचे निदान झाल्यावर त्यांचे नमुने महापालिकेने जनुकीय चाचणीसाठी नीरीच्या प्रयोगशाळेत पाठवले होते.
या दोन्ही रुग्णांना कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोन्ही रुग्णांची माहिती घेतली असता त्यांचे लसीकरण झाले होते. सध्या त्यांना एकही लक्षणे नसून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आहे. खबरदारी म्हणून दोघांना विलगीकरणात राहाण्याच्या सुचना करण्यात आली आहे.
नागरिकांनी घाबरुन न जाता कोरोनाची थोडीही लक्षणे आढळताच त्वरीत चाचणी करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन.बी यांनी केले आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात 44 कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. याशिवाय मोबाईल टेस्टिंग व्हॅनची सुद्धा सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रॅपिड रिस्पॉन्स टिम तैनात
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मनपातर्फे प्रत्येक सॅम्पलची जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे. यामधून दोन रुग्णांना 'बीए.5' व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे पुढे आले आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असून ते घरी आयसोलेशनमध्ये आहेत. नागपुरात विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती गोळा करणे सुरु आहे. कोरोनाची थोडीही लक्षणे आढळली अशांची चाचणी केली जात आहे. यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टिम अर्थात आर.आर.टी. चमू तैनात करण्यात आलेली असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.