आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिकट परिस्थिती:नागपुरात खाटा कमी पडत असल्याने मेडिकलमध्ये एका बेडवर दोन रुग्ण;  मार्चच्या 27 दिवसांत नागपुरात 64 हजार रुग्णांसह 532 मृत्यूची नोंद

नागपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागपूर शहर आणि जिल्ह्यांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने खाटा कमी पडत असल्याचे चित्र आहे

कोरोनाचा सर्वात वाईट कालखंड ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२० होता, असे आतापर्यंत सर्वांनाच वाटत होते. परंतु मृत्यूची संख्या २०२१ मध्ये पुन्हा वाढत आहे. वाढ इतकी तीव्र आहे की चालू मार्च महिन्याच्या २७ दिवसांत नागपूर जिल्ह्यात ६४,१८५ रुग्ण आणि ५३२ मृत्यूची नोंद करण्यात अाली. कोराेनाचा अहवाल नीट तपासला असता ३१ ऑक्टोबर २०२० रोजी नागपूर जिल्ह्याने एक लाखांचा टप्पा ओलांडला. मार्च ते ऑक्टोबर २०२० दरम्यान एकूण १,०२,७८६ प्रकरणांपैकी ८१,४८७ रुग्ण नागपूर शहरातील होते. ग्रामीण भागातील २०,७०३ ग्रामीण भागातील होती. आणि ५९६ प्रकरणे नागपूर जिल्ह्याबाहेरील लोकांची आहेत. कोरोना-१ मधील पहिल्या रुग्णाला शोधून जवळपास आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस, ताज्या प्रकरणांची संख्या कमी झाली.

४ जानेवारी २०२१ रोजी नागपूर जिल्ह्याने १,२५,३३२ रुग्णसंख्या गाठून आणखी एक रेकाॅर्ड केला. नुकत्याच नोंदवलेल्या प्रकरणांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याच्या संख्येत आणखी सुधारणा झाल्यामुळे अधिकृत आकडेवारीनुसार, बरे होण्याचे प्रमाण ९३.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तथापि, त्यानंतरची परिस्थिती झपाट्याने निसटत गेली. १ मार्च रोजी एकूण रुग्णसंख्या १,२५,३३२ वर पोहोचली आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत २५,३३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यातून सावरण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवारी विकएंड कर्फ्यू लावून पाहिला. पण त्याचा परिणाम दिसून आला नाही. त्या नंतरही रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. १ मार्च रोजी नोंदवल्यानुसार, एकूणच रिकव्हरी रेट ९१.५२ टक्क्यांपर्यंत घसरत चालला आहे.

त्यानंतर, परिस्थिती केवळ झपाट्याने घसरली. मार्चच्या २७ दिवसांत जिल्ह्यात ६४,१८५ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ४९,६०० एकट्या नागपूर शहरातील आणि १४,५०८ ग्रामीण भागातील आहेत. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत एकूण शहर (ग्रामीण भाग आणि बाहेरील जिल्ह्यातील लोकांची संख्या) मिळून ३,४०३ मृत्यू संख्या होती. दोन महिन्यांच्या कालावधीत १ नोव्हेंबर २०२० ते ४ जानेवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात एकूण ५६२ मृत्यूची नोंद झाली आहे. मेडिकलमध्ये अशी स्थिती आहे

खाटांची अपुरी व्यवस्था
नागपूर शहर आणि जिल्ह्यांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने खाटा कमी पडत असल्याचे चित्र आहे. खासगीवर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने सारा भार मेयो आणि मेडिकलवर पडत आहे. रुग्णसंख्या दुप्पट, तिप्पट झाल्याने एका बेडवर दोन पेशंटला ठेवण्यात येत आहे. मेडिकलच्या तळघरात खाटांची व्यवस्था केली. पण, तीही अपुरी पडत असल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...