आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन्यजीव क्षेत्रातील दुःखद घटना:भंडाऱ्यात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले, दोन महिन्यांचे आहेत दोन्हीही मादी बछडे

भंडाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गराडा गावानजीक कालव्याच्या सायफन टाक्यात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले.

भंडारा येथे वाघाच्या दोन बछड्यांचे मृतदेह आढळले आहेत. भंडारा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरील गराडा/बूज(पहेला) गावाजवळून जाणाऱ्या नहराच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये मंगळवारी सकाळी दोन बछडे आढळले. आज बुधवारी सकाळी भंडारा जवळील बेला येथे एका वाघाचे वास्तव्य असल्याचे आढळले होते. त्या वाघाशी या दोन बछड्याचा काही संबंध आहे का याचा तपासही सुरू आहे.

दोन बछडे मृतावस्थेत आढळले. आज बुधवारी सकाळी भंडारा तालुक्याच्या गराडा गावाजवळ ही घटना उघडकीस आली. याबाबत माहिती मिळताच संबंधित सर्व वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्याच्या सायफन टाक्यात दोन्ही बछडे आढळले. दोन महिन्याचे असलेले दोन्ही बछडे मादी आहेत. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय याचा शोध वनविभाग घेत आहे. वन विभागाने ते मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर गडेगाव वन डेपो येथे अंत्यसंस्कार केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...