आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Two Tiger Organ Smugglers Arrested, 15 Tiger Claws, 10 Pairs Of Teeth, 5 Kg Bones Seized; Joint Operation Of Nagpur Bhandara Forest Department

वाघांच्या अवयवांची तस्करी करणारे दोघे अटकेत:15 वाघ नखे, 10 जोडी दात, हाडेही जप्त; नागपूर-भंडारा वन विभागाची कारवाई

नागपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर व भंडारा वन विभागाने संयुक्त कारवाई करीत वाघाच्या अवयवांची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईने वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भंडारा वन विभागा अंतर्गत नाकडोंग्री वन परिक्षेत्रमधील गोबरवाही येथे सापळा रचून दोन आरोपींसह 15 वाघ नखे, 10 दात जोडी, आणि अंदाजे 5 किलो हाडांसह एक दुचाकी जप्त केली आहे.

वनविभागाच्या खबऱ्यांनी वाघाच्या अवयवाची तस्करी होत असल्याची माहिती दिली. त्याची खातरचमा केल्यावर बनावट ग्राहक तयार करून गेल्या दोन दिवसांपासून आरोपी सोबत खलबत सुरु ठेवली. शनिवार 19 रोजी आरोपीने विक्रीची तयारी दाखवली असता नागपूर आणि भंडारा वन विभाग यांनी संयुक्त पथक तयार करुन सापळा रचला व 2 आरोपींना मुद्देमालासह ताब्यांत घेण्यात आले. आरोपी संजय श्रीराम पुस्तोडे (रा. चिखला माईन्स, वय 41), रामू जयदेव ऊईके (रा. असलपणी वय 33) यांना ताब्यांत घेण्यात आले. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमाद्वारे वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याकरिता नागपूर वन वृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उप वसंरक्षक डॉ. भारत सिंह हांडा, उप वसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात विभागीय वन अधिकारी दक्षता पी. जी. कोडापे, सहायक वनसंरक्षक नरेन्द्र चांदेवार, सहायक वनसंरक्षक संदीप गिरी व साकेत शेंडे आदींनी सापळा यशस्वी केला.

वनविभाग नेहमीच कारवाई करीत वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करते. यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये वाघाचे दात आणि नखाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाने अटक केली होती. आरोपीकडून सहा दात, 18 नखे जप्त करण्यात आली होती. शिकार करण्यात आलेला वाघ नागभिड तालुक्यातील आलेवाही वनक्षेत्रातील होता, अशी कबुली आरोपींनी दिली. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात वाघाचा चमड्यासह सहा आरोपींना पकडण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...