आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा:एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू

भंडारा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव एसटी बसने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील खोलमारा फाट्यावर मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

कुलदीप गिरधर नारनवरे (३५) रा. धानोरी ता. साकोली हे नित्याप्रमाणे त्यांच्या दुचाकीने लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत निघाले होते. दरम्यान, जैतपूर-खोलमारा फाट्यावर भरधाव असलेल्या एसटी बस क्रमांक एमएच १२ डीएफ ६९१९ ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी दिघोरी (मोठी) पोलिसांनी घटनास्थळी गाठत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...