आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुन्हे शाखेला अनसिंग येथील बसस्थानक चौक व माळी वेटाळ या दोन ठिकाणी काही जण मोबाईलच्या सहाय्याने आरसीबी विरुद्ध एलएसजी या सामन्यातील प्रत्येक रन, बॉलिंग व बॅटिंगवर पैसे लावून सट्टा लावत असल्याची माहिती मिळाली हाेती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने अनसिंग बसस्थानक चौकात छापा टाकला असता एक जण क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याचे निदर्शनास आले. पाेलिसांनी एकाला ताब्यात घेत मोबाईल, टीव्ही संच असा ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पथकाने अनसिंग शहरातील माळी वेटाळ येथे ही छापा टाकून मोबाईल फोन व टीव्ही संच, असा ४० हजारांच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध अनसिंग पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पाेलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, पाेलिस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, पाेलिस हवालदार किशोर चिंचोळकर, दीपक सोनवणे, पोलिस नाईक अमाेल इंगोले, प्रवीण राऊत, गजानन गोटे, रेश्मा ठाकरे, संतोष शेणकुडे, शुभम चौधरी व रमेश जामकर यांच्या पथकाने केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.