आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका:उद्धव ठाकरे सत्ता गेल्याने आलेल्या नैराश्यातून बोलत आहेत

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ता गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातून उद्धव ठाकरे बोलत आहेत. अशा निराश लोकांवर फार प्रतिक्रिया देणे योग्य नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारविराेधात उद्धव ठाकरे यांनी दंड थोपटले आहेत. “शिवसेनेला जमिनीवर आणा’ असा संदेेश शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यावर शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देऊ, असे सांगत भाजपला सडेतोड उत्तर देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल. मेळाव्यात आम्हाला जमीन दाखवणाऱ्यांना जमीन दाखवू असे ठाकरे म्हणाले होते. त्यावर नागपुरात बोलताना फडणवीस यांनी निराश लोकांबद्दल काय बोलायचे, असे म्हणत ठाकरे यांना महत्त्व देत नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.

कुठलेही मैदान ब्लॉक नाही, नियमाने कामे होतील सरकारने कुठलेही मैदान ब्लॉक केलेले नाही. याबाबतीत सर्व काही नियमाने होईल. नियमात असेल त्यांना मैदाने मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा माॅस्कोमध्ये लावला जात आहे. हा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि गर्वाचा क्षण आहे, असे फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...