आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा:म्हणाले- ''उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही''

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येणाऱ्या काळात आपण सर्व आश्चर्य चकित व्हाल एवढे पक्षप्रवेश भाजपामध्ये होईल. 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना केला.

शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी 25 ते 30 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गुरूवारी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. विभागीय भाजपा कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

लवकरच संपूर्ण अमरावती लोकसभा, तिवसा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते औपचारिक कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश घेणार आहे. या शिवाय शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे असे बावनकुळे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे गटाकडचे काही कार्यकर्ते शिंदे गटात आणि काही भाजपमध्ये येत आहेत. 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील. येणाऱ्या काळात भाजपामध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होणार आहे. पुढच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीकडेही विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही, अशी दर्पोक्ती बावनकुळे यांनी केली.

मनसे प्रमुख राज ठाकरे पक्ष संघटन बळकट करण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. याबाबत विचारले असता राज ठाकरे यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असे ते म्हणाले. भाजप-मनसे युतीचा आता काही विचार नाही. मात्र, जसा काळ पुढे जाईल तसे निर्णय घेऊ असे बावनकुळे यांनी सांगितले. नागपुरात झालेला कार्यक्रम फक्त एक झलक आहे. शिवसेनाच नव्हे तर काँग्रेस व राष्ट्रवादीसह अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. भारतीय जनता पक्षात येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. संपूर्ण राज्यात पक्षप्रवेश सोहळे घेण्यात येईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेसोबत भगवा फडकवू.

बातम्या आणखी आहेत...