आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोचक प्रतिक्रिया:उद्धवजी टोमणे मारतात अन् माझी पत्नी उत्तर देत बसते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टोलेबाजी

नागपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यात अनेकदा शाब्दिक वाद पाहायला मिळतो. दोघांवरील वादात आता देवेंद्र फडणवीसांनीही उडी घेत मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारणे सोडत नाहीत अन् अमृता नको त्या गोष्टीला उत्तर देणे टाळत नाही. खरे म्हणजे उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी राखली पाहिजे व अमृतानेही प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याचे टाळायला हवे. तिने अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अर्थात, हा त्या दोघांचा प्रश्न आहे. मी यापेक्षा जास्त काही बोलणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाउत्सव कार्यक्रमात अमृता फडणवीसांच्या गाण्यांवरून त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्यानंतर अमृता फडणवीसांनी ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर पलटवार केला होता.

आदित्य मर्सिडीझ बेबी
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या मर्सिडीझ बेबींनी संघर्ष पाहिला नाही. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते करू शकतात, असा टोला फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मारला. बाबरी ढाचा पाडला त्या वेळी मी स्वत: तिथे होतो. मागील जन्मात मी असेन तर १८५७ च्या युद्धातही तात्या टोपे व झाशीच्या राणीसोबत लढत असेन. अन् तुम्ही असाल तर त्याही वेळेस तुम्ही इंग्रजांशी युती केली असेल, असा टाेलाही त्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...