आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी:नोकरी गेेल्याने एका बेरोजगार तरुणाची मालकाकडे 50 कोटींच्या खंडणीची मागणी, फोनच्या काॅल डिटेल्सवरून झाला ट्रेस

नागपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ए. के. गांधी या नागपूर विदर्भातील ख्यातनाम दुचाकी िवक्रेत्याच्या दुकानातील नोकरी सुटल्याचा राग मनात ठेवून एका विक्षिप्त बेरोजगाराने ए. के. गांधी यांच्या स्नुषा निधी गांधी यांना मोबाइलवर अश्लील मेसेजेस पाठवून ५० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी धंतोली पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अारोपी आशिष आदेश गोडबोले हा तीन वर्षांपूर्वी ए. के. गांधी यांच्या बर्डी येथील दुकानात असिस्टंट अकाउंटंट म्हणून कामाला होता. एक दीड वर्ष त्याने तिथे काम केले. यादरम्यान कामात चुका झाल्याने आशिषला नोकरीतून काढले. ए. के. गांधीच आपल्याला काम मिळू देत नाही, या गैरसमजातून त्याच्या मनात राग निर्माण झाला. पूर्वी काम करीत असल्यामुळे त्याने त्यावर सुरूवातीला निधी गांधी यांना अश्लील मेसेजेस तसेच पैसे न दिल्यास फॅमिली संपवू असे मेसेज पाठवणे सुरू केले होते.

फोनच्या काॅल डिटेल्सवरून झाला ट्रेस
सुरुवातीला गांधी कुटुंबीयांनी कोणीतरी खोडसाळपणा करीत असेल म्हणून दुर्लक्ष केले. मात्र प्रकार वाढत गेल्याने ए. के. गांधी यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून त्याच्या विरुद्ध कलम ३८७ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आशिषच्या फेसबुक अकाउंटवरून त्याचा पत्ता मिळत नव्हता. म्हणून त्याचा सीडीआर तपासण्यात आला असता त्याचे जावई विनोद शेंडे यांच्याशी सर्वाधिक बोलत असल्याचे लक्षात आले. त्यांना ठाण्यात बोलावून आशिषचा पत्ता मिळवला. वाठोडा येथील स्वामी नारायण मंदिराजवळ तो त्याच्या वृद्ध आईसोबत राहतो. एपीआय देवाजी नरोटे यांनी त्याला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...