आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींची घोषणा:पूरग्रस्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात पूर पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. यासोबतच, प्रामुख्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रस्त्यांचे नुकसान झाले. गणेशोत्सवापूर्वीच या रस्त्यांचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी होत आहे. त्यावरूनच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.0

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत नुकतीच भेट घेतली. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून मोठ्या संख्येने लोक कोकणात जातात. अशात मुंबई-गोवा हायवेचे काम तातडीने करण्याची मागणी तटकरे यांनी या भेटीत केली होती. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली आहे.

मंजूर झालेल्या 100 कोटी रुपयांपैकी 52 कोटी रुपये तात्पुरत्या आणि तातडीच्या दुरुस्तीसाठी खर्च केले जाणार आहेत. तर उर्वरीत 48 कोटी रुपये हे कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी दिले जात आहेत. अशी माहिती गडकरी यांनी ट्विट करून दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण जवळ असलेल्या वशिष्टी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराब झाला. त्याची दुरुस्ती करून 72 तासांत तो पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असेही गडकरी यांनी सांगितले आहे.

एवढेच नव्हे, तर परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट येथील रस्त्यात आलेले अडथळेही दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीची कामे आधीच हातात घेण्यात आली आहेत. कायमची दुरुस्ती करण्याचेही काम प्राधान्याने केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...