आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:'मनपाची सर्व वाहने 6 महिन्यात CNG करा', केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नागपूर महापालिकेला सूचना

नागपूर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महापौरांच्या गाडीपासून ते कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांपर्यंत सर्व वाहने CNG करण्याच्या सूचना

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन क्षेत्रात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सहा महिन्यात मनपाकडे असलेली सर्व वाहने अगदी महापौरांच्या गाडीपासून ते कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांपर्यंत सर्व गाड्या CNG करा अशी सूचना त्यांनी नागपूर महापालिकेला केली आहे. त्यासाठी CNG फिलिंग सेंटर उभ्यारण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पर्यावरण हित आणि आर्थिक नियोजनासाठी गडकरी यांना महापालिकेला हा मोलाचा सल्ला दिला आहे. नागपुरातील शिवाजीनगर येथील भाजपच्या आत्मनिर्भर भारत केंद्राचे रविवारी उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस अर्थात CNGवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठी इंधनबचत होते. त्याचबरोबर प्रदुषणालाही आळा बसतो. इलेक्ट्रिक वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा CNG वाहनांचे प्रदूषण खूप कमी असते. त्यामुळे तज्ञांकडून CNG वाहनांचा वापर वाढवण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येत असते.

CNG आणि LPG गॅस मधील फरक

CNG आणि LPG मधील महत्वाचा फरक हा आहे की CNG मध्ये प्रामुख्याने मिथेन वायू असतो. तर LPG मध्ये प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन असतो. CNG हा वायू स्वरुपात तर LPG हा द्रव स्वरुपात असतो.

बातम्या आणखी आहेत...